संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतं आहे.एफडीआयच्या मुद्यावरुन युपीएचा घटक पक्ष तृणमुल काँग्रेसनं पाठिंबा काढल्यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सरकार सामोरं जातंय. हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 22, 2012, 09:21 AM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतं आहे.एफडीआयच्या मुद्यावरुन युपीएचा घटक पक्ष तृणमुल काँग्रेसनं पाठिंबा काढल्यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सरकार सामोरं जातंय. हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनात तृणमुल काँग्रेस एफडीआयच्या मुद्दावरुन सरकार विरोधात अविश्वास ठराव आणणार आहे. मात्र १९ सदस्य असलेल्या टीएमसीला या मुद्दावर इतर पक्षांचा पाठिंबा मिळताना दिसत नाही. अविश्वास ठराव आणण्यासाठी ५४सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते. त्यामुळं हा आकडा तृणमुल कसा जमावणार याकडं लक्ष लागलंय.
विरोधी पक्षांनी एफडीआयच्या मुद्यावर अविश्वास ठरवाला पाठिंबा दिला नसला तरी एफडीआयच्या मुद्यावर चर्चा होऊन मतदान करण्याची आणि या मुद्यावर सरकारला तोंडघाशी पाडण्याची तयारी केलीय.
एफडीआय व्यतीरीक्त भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुनही सरकारला विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. संसदेचं मागचं अधिवेशन कोळसा घोटाळ्यामुळे कामकाज न होता संपलं होतं. या अधिवेशऩात सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधक करतील. तर संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी या अधिवेशनात २५ विय़ेयकं आणणार असल्याची माहिती दिली.
यामध्ये इश्युरंस, पेंशन, लोकपाल बील, व्हिसल ब्लोअर, महिला आरक्षण बील आणणार असल्याची माहिती दिली. दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधांनी भाजप नेत्यांना आज दुपारी भोजनासाठी बोलावलंय.