नवी दिल्ली : आई होता यावे यासाठी एका महिलेने तिच्या मृत पतीचे स्पर्म देण्याची मागणी एम्सच्या डॉक्टरांकडे केलीये.
काही वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना बाळ होत नव्हते. यात त्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. आपल्या पतीपासून आपल्याला मूल व्हावे अशी त्या महिलेची इच्छा होती. त्यामुळे डॉक्टरांकडे तिने अशी मागणी केली.
दरम्यान, महिलेच्या या मागणीला नवऱ्याच्या कुटुंबियांनी साथ दिलीये. मात्र डॉक्टरांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिलाय. मृत व्यक्तीचे स्पर्म देण्याबाबत कायदा करण्यात आलेला नसल्याने डॉक्टरांनी ही मागणी फेटाळून लावलीये.
मृत व्यक्तीच्या शरीरातून स्पर्म मिळवणे हे ५ मिनिटांत शक्य होते. मात्र याबाबत नैतिक आणि कायदेशीर अडचणी असल्याने आम्ही हे करु शकत नसल्याचे एम्सचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले.