जेव्हा साप त्याच्या मृत्यूचा बदला घेतो

राजस्थानच्या सिरोही जिल्हामध्ये आम्बेश्वर्जी या गावामध्ये एनसीसी शिबीरात रविवारी रात्री पुन्हा एकदा साप चावण्याची घटना घडली. या शिबीरामध्ये अचानक चार कॅडेट्स आजारी पडल्यामुळं   चारही जणांना हॅास्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. यातील दोघांना पाली इथं उपचारासाठी पाठवण्यात आलंय.

Updated: Aug 25, 2014, 03:38 PM IST
जेव्हा साप त्याच्या मृत्यूचा बदला घेतो title=

सिरोही, राजस्थान: राजस्थानच्या सिरोही जिल्हामध्ये आम्बेश्वर्जी या गावामध्ये एनसीसी शिबीरात रविवारी रात्री पुन्हा एकदा साप चावण्याची घटना घडली. या शिबीरामध्ये अचानक चार कॅडेट्स आजारी पडल्यामुळं   चारही जणांना हॅास्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. यातील दोघांना पाली इथं उपचारासाठी पाठवण्यात आलंय.
पालीच्या हॅास्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलेल्या दोन कॅडेट्स पैकी एका व्यक्तीला साप चावला हे उपचारादरम्यान समजलं. दोन लहान मुलांना सिरोही इथं भर्ती करण्यात आलंय जे सापाला बघून इतके घाबरले की आजारी पडले.
पहिल्या घटनेत ज्या विद्यार्थ्यांचा साप चावल्यामुळं मृत्यू झाला त्या ठिकाणाहून एक मेलेला सापही सापडला.  या सापाला विद्यार्थ्यांनीच मारलं आहे आणि त्याच्या बदला सापानं घेतला, अशी अफवा इथं पसरलीय. 
शुक्रवारी या कॅम्पमध्ये ज्युनिअर डिव्हिजनचे विद्यार्थी अर्जुन आणि मुकेश कुमार यांचा साप चावल्यामुळं मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी आता संरक्षण खातंही करणार आहे. एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर विश्र्वजीत सिंह यांनी सांगितलं, चौकशीसाठी एक समिती नेमलीय, त्यात जनरल रॅंक स्तराचा अधिकारी, दोन ब्रिगेडिअर आणि एक कर्नल अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे आधिकारी शनिवारी संध्याकाळी आम्बेश्र्वरजी शिबीरात दाखल होतील. आपल्या चौकशीची माहिती ते संरक्षण खात्यालाही देतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.