नवी दिल्ली : उरी हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही दलाचे प्रमुख आणि काही अधिकाऱ्यांची सिक्रेट मिटींग झाली होती.
२० तारखेला झालेल्या या सिक्रेट मिटींगमध्ये सर्जिकल स्ट्राइकबद्दल चर्चा करण्यात आली आणि योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती, अशी माहिती सूत्रांकडून समजते.
साउथ ब्लॉकमध्ये ही बैठक झाली होती. त्यावेळी पाक पुरस्कृत दहशतवादाला आणि पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचे ठरले होते. यात नॅशनल सिक्युरिटी अॅडव्हाईजर अजित डोवल उपस्थित होते.
साउथ ब्लॉकच्या या स्पेशल रूमला वॉररूमचे स्वरूप येते.