नवी दिल्ली : आपल्या सौरमंडळात किती आणि काय काय रहस्य दडलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी आपले वैज्ञानिक रात्रंदिवस मेहनत घेतायत. पण, अशाच एखाद्या चर्चित वैज्ञानिक प्रयोगांबद्दल एखाद्या लहान मुलाच्या मनात काय काय प्रश्न येत असतील, याचा कधी विचार केलात.
असाच एक प्रसंग आला जेव्हा एका पाच वर्षांच्या मुलानं एक निरागस प्रश्न केला आणि त्याचं उत्तर त्याला चक्क 'इस्रो'नं (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) दिलं.
त्याचं झालं असं की, भारताचं 'मिशन मंगळ' नुकतंच यशस्वी झालं. भारतानं धाडलेलं यशस्वीरित्या मंगळ ग्रहावर दाखल झालं. त्यानंतर इस्रोनं ऑर्बिटरनं धाडलेला एक फोटो प्रसिद्ध केला.
यावर, एका पाच वर्षांच्या मुलानं आपल्या वडिलांच्या मदतीनं इस्रोला ट्विट करून म्हटलं की, 'अरे... हा मंगळ तर पृथ्वीसारखाच दिसतोय'... त्यानंतर त्यानं 'मी १४ वर्षांचा झाल्यावर अॅस्ट्रोनॉट बन सकता हूँ?' असाही प्रश्न त्यानं विचारला.
Awesome! My 5-yr-old who's obsessed with solar system said, it looks exactly like earth.' Congrats @MarsOrbiter pic.twitter.com/gpbabelXSW
— Rifat Jawaid (@RifatJawaid) September 29, 2014
मुलाचा हा प्रश्न पाहिल्यावर 'इस्रो'च्या टीमनं याचं उत्तर देण्यास अजिबात विलंब लावला नाही. 'इस्रो'नं या मुलाला मग मंगळ ग्रहाबद्दल आणखी माहिती दिलीच... आणि आणखी बरंच काही करणं बाकी असल्याचंही म्हटलंय.
@RifatJawaid Hey smart little one! The place looks a lot like home with the icy poles, peaks, caves, canyons and dust storms. Way to go!
— ISRO's Mars Orbiter (@MarsOrbiter) September 29, 2014
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.