जेव्हा लाईव्ह बुलेटीनमध्ये अँकरने वाचली पतीच्या मृत्यूची बातमी

पतीच्या अपघाताची बातमी स्वत: बातमी देतांना वाचली

Updated: Apr 8, 2017, 10:24 PM IST
जेव्हा लाईव्ह बुलेटीनमध्ये अँकरने वाचली पतीच्या मृत्यूची बातमी title=

नवी दिल्ली : कोणत्याही महिलेसाठी तिच्या पतीचा मृत्यू झाला ही गोष्ट कळताच धक्का बसेल. पण त्या महिला अँकरबाबत काय झालं असेल जेव्हा तिने तिच्या पतीच्या अपघाताची बातमी स्वत: बातमी देतांना वाचली. रायपूरमधील एका खाजगी न्यूज चॅनेलमध्ये काम करणाऱ्या अँकर सुप्रीत कौर यांच्यासोबत असं काही घडलं आहे.

सुप्रीत छत्तीसगढच्या महासमुंद जिल्ह्यातील पिथौरा गावमध्ये झालेल्या एका अपघाताची बातमी देत होती. पण या अपघातात तिचाच पती हर्षद कवादे यांचा मृत्यू झाल्याची माहिती तिला कळाली. यानंतर ही तिने बातमी वाचली.

लाईव्ह बुलेटिन दरम्यान महासमुंद जिल्ह्याचे रिपोर्टरने या अपघाताची बातमी दिली. ज्यामध्ये ३ लोकांचा मृत्यू झाला आणि २ जण गंभीर जखमी होते. लाईव बुलेटिन दरम्यानच सुप्रीतला तिच्या पतीचा अपघात झाल्याचा संशय आला. पण बातमी वाचत असतांना मृतांची नावे समोर न आल्याने त्याचा खुलासा नाही झाला. पण बातमीपत्र संपल्यानंतर तिने फोन करुन माहिती घेतली आणि मग ती रडू लागली.

२८ वर्षीय सुप्रीतचा विवाह एक वर्षापूर्वीच झाला होता. बातमी देत असतांना संशय आल्यानंतरही तिने आपलं काम नाही सोडलं.

पाहा व्हिडिओ