www.24taas.com,कामेरेज
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर चांगलच तोंडसुख घेतलं आहे. डिझेल आणि गॅसच्या वाढलेल्या दरवाढीतून सामान्य माणूस सावरत नाही तोच सरकारने विदेशी दुकानदारीला ५१ टक्के गुंतवणुकीसाठी परवानगी देऊन सामान्य माणसांचे जगणे मुश्किल केले आहे. या निर्णयाला देशभरातून विरोध दर्शविण्यात आला आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५१ टक्के विदेशी दुकानदारीला मंजूरी देण्यासाठी सरकारच्या निर्णयाची निंदा केली आणि यासर्व गोष्टींचा सामान्य लोकांच्या घरखर्चावर परिणाम होईल त्याचप्रकारे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल.
प्रचाराच्या वेळेस मोदींनी म्हटले की, “ मला नाही माहित की प्रधानमंत्री काय करत आहेत? या निर्णयामुळे छोट्या दुकानदारांना दुकाने बंद करावी लागतील. त्यामुळे आता पंतप्रधानावर चौफर टीका करण्यात येत आहे. या टीकेला उत्तर देताना पंतप्रधानही पुढे सरसावले आहेत. जावे लागले तर लढून जाऊ अशी त्यांनी भुमिका घेतली आहे.