बरेली : जेव्हा रेल्वे चालकास लघवी लागते तेव्हा तो करतो काय करतो याबाबत सगळ्यांनाच कोडं असेल. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी रेल्वेमध्येच शौचालयाची व्यवस्था केलेली असते पण इंजिनमध्ये ड्रायव्हरसाठी कोणतंही शौचालय नसतं.
जेव्हा ड्राईव्हरला लघवी लागते तेव्हा ते म्हणतात की 'आय एम सिक' म्हणजेच माझी प्रकृती बरी नाही.
भारतीय रेल्वेमध्ये एक्सप्रेस आणि सुपरफास्ट रेल्वेचे लोको पायलट हा संदेश शौचालयास जाण्यासाठी कंट्रोल रूमला देतात.
कंट्रोल रूमला हा संदेश दिल्यानंतर कंट्रोल रूम पुढच्या स्टेशन मास्तरला दुसऱ्या ड्राईव्हरची व्यवस्था करण्यासाठी सांगतात. ज्यामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम होऊ नये.
इंजिनमध्ये लघवी किंवा शौचालयाची कोणतीही व्यवस्था नसल्याने चालकाला 'आय एम सिक' हा संदेश कंट्रोल रूमला द्यावा लागतो आणि संबधीत लोकं त्यांच्यासाठी व्यवस्था करण्याच्या कामात लागतात.
देशभरात हजारो चालक काम करतात. ज्यांच्या कामाचे तास ८ तास असतात. परंतु गाड्यांना उशीर झाल्यास त्यांच्या कामाचे तास १० ते १२ तासही होतात.
इंजिनमध्ये शौचालय बनवण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे दिला गेला होता यावर कामही सुरू झालं होतं पण ते अजून पूर्ण झालेलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.