पाहा व्हिडिओ - भाजप आमदारामुळे नाही कसा तुटला घोड्याचा पाय

मसूरीचे भाजप आमदार  गणेश जोशी यांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे पोलिसांच्या घोड्याचा पाय मोडला, असा दावा सत्ताधारी काँग्रेस करत असली तरी घोड्याचा पाय मोडण्याचे कारण वेगळेच आहे. 

Updated: Mar 15, 2016, 03:00 PM IST
पाहा व्हिडिओ - भाजप आमदारामुळे नाही कसा तुटला घोड्याचा पाय  title=

डेहराडून : मसूरीचे भाजप आमदार  गणेश जोशी यांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे पोलिसांच्या घोड्याचा पाय मोडला, असा दावा सत्ताधारी काँग्रेस करत असली तरी घोड्याचा पाय मोडण्याचे कारण वेगळेच आहे. 

या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.  हा प्रकार भाजपने भ्रष्टाचार आणि कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मोर्चा काढला होता. विधानसभेवर काढलेल्या या मोर्च्याला उत्तराखंड पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. 

या संदर्भात दोन व्हिडिओ समोर आले, पहिल्या व्हिडिओत आमदार काठीने हल्ला करत आहे आणि घोड्याचा पाय मोडला आहे. आणि आता दुसरा व्हिडिओ समोर येत असून झालेल्या धक्काबुक्कीनंतर घोडा एका जीपला धडकला आणि त्याचा पाय एका मॅनहोलमध्ये अडकला. 

या अपघातात त्याचा पाय मोडल्याचा दावा भाजपने केला आहे. 

पाहा कसा तुटला पाय