नवी दिल्ली: बुधवारी आम आदमी पार्टीच्या रॅलीत आत्महत्या करून एकच खळबळ उडवून देणाऱ्या गजेंद्र सिंहला मुळात आत्महत्या करायचीच नव्हती, असा खुलासा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय.
गजेंद्र सिंह आत्महत्या करण्याच्या हेतूने झाडावर चढलेलाच नव्हता, असं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. केवळ, लोकांचं आणि मुख्यत: माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी गजेंद्र झाडावर चढला होता... आत्महत्या करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता, असं गजेंद्रच्या कुटुंबीयांनी म्हटलंय. तसंच, झाडावरून खाली फेकलेला कागद म्हणजे गजेंद्रची सुसाईट नोट नव्हती तर तो मदत मागत असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केलीय.
'मी टीव्हीवर दिसतोय... मला टीव्हीवर पाहा' असं गजेंद्रनं आपल्या भावाला - विजेंद्र सिंहला फोन करून माहिती दिली होती... असा खुलासाही गजेंद्रच्या गावातील एका व्यक्तीनं केलाय. गावकऱ्यांच्या मते गजेंद्र चांगल्या स्वभावाचा आणि सतत दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तत्पर होता.
गजेंद्र जंतर-मंतरवर होणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी होऊन, शेतकऱ्यांच्या समस्येकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करायचा होता. रॅलीनंतर त्याला आपल्या नातेवाईकांकडेही जायचं होतं, असं समजतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.