फेव्हिक्विकच्या 'त्या' जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी...

सध्या गाजत असलेली फेविक्विकची 'तोडो नही, जोडो' असं म्हणणाऱ्या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजपचे खासदार चिंतामणी मालविय यांनी केलीय. या जाहीरातीमुळे भारतीय सैन्याचा अपमान होत असल्याचं भाजप खासदारांचं म्हणणं आहे.  

Updated: Apr 23, 2015, 05:35 PM IST
फेव्हिक्विकच्या 'त्या' जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी...  title=

नवी दिल्ली : सध्या गाजत असलेली फेविक्विकची 'तोडो नही, जोडो' असं म्हणणाऱ्या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजपचे खासदार चिंतामणी मालविय यांनी केलीय. या जाहीरातीमुळे भारतीय सैन्याचा अपमान होत असल्याचं भाजप खासदारांचं म्हणणं आहे.  

या जाहिरातीत भारत आणि पाकिस्तान सैनिकांमध्ये दाखवलेले प्रेमाचे संबंध चुकीचे असल्याने या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी... तसंच ही जाहिरात बनविणाऱ्या लेखकावर, निर्मात्यावर आणि दिग्दर्शकावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी देखील मागणी मालविय यांनी केलीय.  

यापूर्वीही फेविकॉलच्या जाहिरातींचे 'दम लगा के हैशा' ते 'फेव्हिकॉल का जोड है... तुटेगा नही' ही ब्रीदवाक्ये लोकप्रिय झाली आहेत. मात्र, भारत-पाकिस्तान संबंधांसारख्या संवेदनशील विषयावर बनवण्यात आलेली ही जाहिरात मालविय यांना खटकलीय. 

या जाहिरातीत भारत-पाकिस्तान सैन्यामध्ये वाघा सीमेवर होणाऱ्या संचलनात पाक सैनिकाच्या पायातील बुटाचे तळ फाटलेले दाखविण्यात आले आहेत. पण, हा बुटाचा फाटलेला तळ भारतीय सैनिकाच्या लक्षात येतो आणि तो फेव्हिक्विक लावून पाकच्या सैनिकाला मदत करतो... आणि 'तोडो नही, जोडो' असा संदेश देताना ही जाहिरात दिसते. 

जाहिरात पाहा-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.