पाहा : लेस्बियन रिलेशनशिपवर देशातील पहिली जाहिरात व्हायरल

भारतीय समाजात आजही एक मोठा वर्ग समलैंगिक संबंधांना पूर्णपणे स्वीकारायला तयार नाही, आणि अशा वेळी संबंलैंगिक संबंधांवर एक जाहिरात आली आहे, या जाहिरातीत दोन मुलींच्या अंतर्गत संबधांवर भाष्य करण्यात आलं आहे. या जाहिरातीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात दोन मुली एकमेकांवर प्रेम व्यक्त करीत आहेत. या मुलींना आपलं संपूर्ण जीवन एकमेकांसोबत जगायचं आहे.

Updated: Jun 11, 2015, 01:58 PM IST
पाहा : लेस्बियन रिलेशनशिपवर देशातील पहिली जाहिरात व्हायरल  title=

मुंबई : भारतीय समाजात आजही एक मोठा वर्ग समलैंगिक संबंधांना पूर्णपणे स्वीकारायला तयार नाही, आणि अशा वेळी संबंलैंगिक संबंधांवर एक जाहिरात आली आहे, या जाहिरातीत दोन मुलींच्या अंतर्गत संबधांवर भाष्य करण्यात आलं आहे. या जाहिरातीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात दोन मुली एकमेकांवर प्रेम व्यक्त करीत आहेत. या मुलींना आपलं संपूर्ण जीवन एकमेकांसोबत जगायचं आहे.

ही जाहिरात आता व्हायरल झाली आहे, या जाहिरातीला आतापर्यंत २ लाख ६० हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. या जाहिरातील 'द व्हिजीट' नाव देण्यात आलं आहे, खरंतर ही जाहिरात एक कपड्याच्या ब्रँडवर आहे.

भारतातील ही पहिली समलैंगिक जाहिरात आहे, ही इंटरनेटवर व्हायरल झाली आहे, मागील दहा दिवसात अडीच लाख लोकांनी ही जाहिरात पाहिली आहे. या मुली आपल्या पालकांना भेटणार आहेत, त्यासाठी त्या तयार होत आहेत. या लेस्बियन लिव इन रिलेशनशीपमध्ये आहेत आणि आपल्या दिनक्रमाच्या तयारीत आहेत. या मुली एकमेकांच्या अपेक्षा आणि आव्हानांवरही चर्चा करीत आहेत.

ही जाहिरात पाहा....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.