मतदानासाठी आता अंगठ्याचे ठसे?

निवडणुकीतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासोबतच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बायोमेट्रीक मशिन्सही लावल्या जाणार आहेत.

Updated: Mar 8, 2015, 06:00 PM IST
मतदानासाठी आता अंगठ्याचे ठसे? title=

नवी दिल्ली : निवडणुकीतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासोबतच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बायोमेट्रीक मशिन्सही लावल्या जाणार आहेत.

बोगस मतदानावर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील मतदानात मतदारांच्या अंगठ्याचे ठसे बंधनकारक करण्याची तयारी सुरु केली आहे. 

२०१९ च्या प्रस्तावित लोकसभा निवडणुकीतील मतदानादरम्यान मतदारांच्या अंगठ्याचे ठसे घेण्याची तयारी आयोगाने सुरु केली आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांना एसएमएसद्वारे मतदान केंद्राची माहिती देण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. याशिवाय १५ ऑगस्टपर्यंत मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याचे कामही सुरु होईल असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.