भारतासह अनेक देशांमध्ये फोन होतायेत टॅप, वोडाफोननं केलं कबुल

प्रमुख दूरसंचार कंपनी वोडाफोननं स्वीकार केलंय, की सरकारी एजंन्सीज त्यांच्या नेटवर्कवर होणारं बोलणं (कॉल्स, मॅसेज आणि इ-मेल) वारंट शिवाय ऐकतात. कंपनीनं या सरकारी एजेंसिंना अशा गुप्त तारे लावण्याची परवानगी दिली. ज्यामुळं सर्व बोलणं ते ऐकू शकतात.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 8, 2014, 02:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
प्रमुख दूरसंचार कंपनी वोडाफोननं स्वीकार केलंय, की सरकारी एजंन्सीज त्यांच्या नेटवर्कवर होणारं बोलणं (कॉल्स, मॅसेज आणि इ-मेल) वारंट शिवाय ऐकतात. कंपनीनं या सरकारी एजेंसिंना अशा गुप्त तारे लावण्याची परवानगी दिली. ज्यामुळं सर्व बोलणं ते ऐकू शकतात.
कंपनीचं म्हणणं आहे की, त्यांचं संचालन असलेल्या जवळपास 29 देशांमध्ये नेटवर्कवर होणारी चर्चा ऐकली (टॅप केली) जाते. वोडाफोननं 20 पानी एका अहवालात सरकारी एजंसींसोबत आपल्या सहकार्याचा खुलासा केलाय. यानुसार त्यांच्या नेटवर्कसोबत तारे जोडली गेली आहेत. ज्याद्वारे बोलणं ऐकलं किंवा रेकॉर्ड केलं जातं.
एजंसीज या तारांद्वारे बोलत असलेल्या व्यक्तींची जागाही सांगू शकतात. कंपनीनं सांगितलं की, जगातील कंपनी म्हणून विविध देशांमध्ये काम करत असतांना त्या-त्या देशातील सरकारी नियम आणि अपेक्षा पूर्ण करून तणावाचा सामना करावा लागतो. कोणत्याही देशातील कायद्याचं पालन करण्यास नकार देता येवू शकत नाही. वोडाफोनं सांगितलं की, फोन टॅपिंग बाबत सुरू असलेल्या चर्चेत आपलं योगदान देण्यासाठी त्यांनी ही सूचना प्रकाशित केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.