माल्ल्याच्या 'किंगफिशर व्हिला'चा लिलाव होणार

विजय माल्ल्याच्या आलिशान किंगफिशर व्हिलाचा १९ ऑक्टोबरला लिलाव होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं या लिलावाचं आयोजन केलंय. 

Updated: Sep 13, 2016, 03:33 PM IST
माल्ल्याच्या 'किंगफिशर व्हिला'चा लिलाव होणार title=

पणजी : विजय माल्ल्याच्या आलिशान किंगफिशर व्हिलाचा १९ ऑक्टोबरला लिलाव होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं या लिलावाचं आयोजन केलंय. 

एसबीआय कॅप्सनं लिलावाची ही तारीख जाहीर केलीय. या लिलावासाठी ८५.२९ कोटी प्राथमिक किंमत ठेवण्यात आलीय. 

गोव्यातल्या प्रसिद्ध कैंडोलिम भागात हा 'किंगफिशर व्हिला' आहे. किंगफिशऱ व्हिलाचा १२ हजार ३५० स्क्वेअर मीटर आहे. यामध्ये तीन मोठे बेडरुम आणि एक मोठा लिव्हिंग रुम आहे. या व्हिलामध्येच माल्यानं पाच महिन्यांपूर्वीच आपला ६० वा वाढदिवस साजरा केला होता. 

ज्यांना या लिलावात भाग घ्यायचाय ते २६ आणि २७ सप्टेंबर रोजी गोव्यामधली हा किंगफिशर व्हिला पाहू शकणार आहेत. 

यापूर्वी बँकेनं माल्याची इतर प्रॉपर्टी विकण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना कुणीही ग्राहक मिळाला नाही.