क्रीडा मंत्र्यांचे हे प्रताप पाहून हसायचं का रडायचं?

भारताचे क्रीडा मंत्री विजय गोयल आणि वाद हे आता समीकरणच झालं आहे.

Updated: Aug 28, 2016, 08:29 PM IST
क्रीडा मंत्र्यांचे हे प्रताप पाहून हसायचं का रडायचं? title=

नवी दिल्ली : भारताचे क्रीडा मंत्री विजय गोयल आणि वाद हे आता समीकरणच झालं आहे. रिओ ऑलिम्पिकवेळी विजय गोयल यांच्या वागणुकीवर टीका झाली होती. यानंतर दीपा कर्माकरबद्दल ट्विट करताना क्रीडामंत्र्यांनी तिचं नाव तर चुकवलंच पण दीपाचा फोटो लावण्याऐवजी त्यांनी स्वत:चाच फोटो लावला. क्रीडा मंत्री आता पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. 

रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकनं ब्रॉन्झ आणि पी.व्ही.सिंधूनं सिल्व्हर मेडल जिंकलं, पण या दोघींनी गोल्ड मेडल जिंकल्याचं विजय गोयल म्हणाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं गोयल यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

'साक्षी-सिंधूला गोल्ड मेडल'

हे कमी म्हणून की काय यानंतर क्रीडामंत्र्यांनी अभिनेता सुनिल शेट्टीबरोबर भेट घेतल्याचा फोटो ट्विट केला आहे. सुनिल शेट्टीबरोबर भारतातल्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळ धोरण विकसित करण्यासाठी सुनिल शेट्टीची भेट घेतल्याचं या ट्विटमध्ये गोयल म्हणाले आहेत. आता अभिनेता असलेल्या सुनिल शेट्टीनं गोयल यांच्याबरोबर खेळाच्या विकासासाठी कोणती चर्चा केली हा प्रश्न आहेच.