संगरुर, पंजाब : प्रत्येक शीख व्यक्तीला आपली पगडी खूप प्रिय असते. तो मान ते कधीच खाली पडू देत नाहीत. पण आपल्या प्रथेला दूर सारत संगरूरच्या दोन शीख तरुणांनी आपल्या पगडीच्या सहाय्यानं बुडणाऱ्या 8 तरुणांचे प्राण वाचवले आहेत.
रविवारी गणपती विसर्जनाला सुलार घाटावर काही लोक आले होते. आठ मुलं पाण्यात उतरुन गणेशाची मूर्ती विसर्जित करत होते. तितक्यात कालव्याच्या पाण्याची पातळी वाढली आणि मुलं बुडायला लागलीत. तिथंच गणपती विसर्जन पाहत असलेल्या इंद्रपाल सिंह आणि कंवलजीत सिंहयांनी आरडाओरडा ऐकला. त्यांनी कोणतीही तमा न बाळगता तातडीनं स्वता:ची पगडी उघडून पाण्यात बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी फेकली. तिला पकडून ही मुलं पाण्यातून बाहेर आलीत.
हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. सर्वांनीच या दोन्ही शीख तरुणांचं कौतुक केलं आणि स्थानिक प्रशासनानं त्यांना बक्षीसही जाहीर केलंय.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.