तुम्हाला वेश्या बनायचंय? विहिंपचा मुलींना प्रश्न

'तुम्हाला वेश्या बनायचंय?' हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये जाहीररित्या मुलींना विचारला जातोय. 

Updated: Sep 9, 2014, 05:34 PM IST
तुम्हाला वेश्या बनायचंय? विहिंपचा मुलींना प्रश्न title=

अहमदाबाद : 'तुम्हाला वेश्या बनायचंय?' हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये जाहीररित्या मुलींना विचारला जातोय. 

विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) गुजराती भाषेत छापलेल्या पत्रकांत हा प्रश्न विचारण्यात आलाय. तुम्हाला वेश्या बनायचंय? नसेल तर हे वाचा आणि विचार करा' असं यात म्हटलं गेलंय. मुस्लिम युवकांकडून हिंदू मुलींना फितवण्याबद्दल या पत्रकांत चेतावणी दिली गेलीय. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ही संस्था गुजरातमध्ये सुस्त झाली होती आता मात्र पुन्हा सक्रीय होत आपला अजेंडा पुढे नेण्यावर तिचं काम सुरू झालंय. 

या पत्रकांत 'लव्ह जिहाद'वर भाष्य करत मुस्लिम तरुण हिंदू मुलींना आपली बाईक दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांना आपली दुसरी-तिसरी पत्नी बनवून वेश्या व्यवसायात ढकलतात. ही त्यांची धार्मिक जबाबदारी असल्याचं ते समजतात. मुलींना लुभावण्यासाठी मुस्लिम गुंडांना करोडो रुपये दिले जातात, असं या पत्रकांत म्हटलं गेलंय. 

मुस्लिम धार्मिक संस्था 'जमात-ए-इस्लामी हिंद'नं यावर प्रतिक्रिया देत अशा पद्धतीनं घृणा पसरवणाऱ्या अभियानावर सत्ताधारी पक्षाची चुप्पी चिंताजनक असल्याचं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.