ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अनंतमूर्ती यांचे निधन

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कन्नड साहित्यिक यू.आर.अनंतमूर्ती यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

Updated: Aug 22, 2014, 09:39 PM IST
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अनंतमूर्ती यांचे निधन title=

बंगळुरु : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कन्नड साहित्यिक यू.आर.अनंतमूर्ती यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी १९९८ मध्ये भारत सरकारकडून त्यांना 'पद्म भूषण'  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. तर, त्याआधी १९९४ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानेही गौरविले होते.

अनंतमूर्ती हे भारतातील दिग्गज साहित्यिकांपैकी एक होते. गद्य आणि पद्य या दोन्ही साहित्य निर्मितीत अनंतमूर्ती यांचे मोलाचे योगदान आहे. कन्नड नवकथाकार आणि कादंबरीकार म्हणून अनंतमूर्ती यांचे नाव साहित्य क्षेत्रात आदराने घेतले जाते. 

मैसूर विश्वविद्यालयात काही वर्षे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर महात्मा गांधी विश्वविद्यालयाचे कुलगुरू होते. तसेच केंद्रीय साहित्य अकादमीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.