तोटा सहन करून गरिबांना १ रुपयात देतात जेवण

महागाई आपण १ रुपयात काय खरेदी करू शकतात? वेंकटरमण गेल्या आठ वर्षापासून गरीब मुलांना जेवण देतात, ते एक मेस चालवतात, आणि सकाळ संध्याकाळ टीफिन सर्व्हिस देतात. 

Updated: Sep 9, 2015, 09:29 PM IST
तोटा सहन करून गरिबांना १ रुपयात देतात जेवण  title=

चेन्नई : महागाई आपण १ रुपयात काय खरेदी करू शकतात? वेंकटरमण गेल्या आठ वर्षापासून गरीब मुलांना जेवण देतात, ते एक मेस चालवतात, आणि सकाळ संध्याकाळ टीफिन सर्व्हिस देतात. 

२००७ मध्ये एक घटना घ़डली त्याने त्यांचे संपूर्ण जीवन बदलून टाकले. त्या आठवणींना उजाळा देताना ते सांगतात, त्यांच्या मेसमध्ये एक वृध्द महिला आली होती. ती आपल्या आजारी पतीसाठी इडली खरेदी करण्यासाठी आली होती. पण इडली संपल्या होत्या. वेंकट यांनी महिलेला सांगितले की १० रुपयांमध्ये तीन डोसा घ्या. या सल्ल्यानंतर महिलेने सांगितले की डोसे महाग आहे. वेंकट यांनी १० रुपयात ६ डोसे देऊ केले. 

या घटनेनंतर त्यांनी गरिबांसाठी खूपच कमी किंमतीत जेवण देण्याचे सुरू केले. दुसऱ्या दिवशी ते हॉस्पिटलमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी नर्स आणि डॉक्टरांना सांगितले. त्यांनी सांगितले की ते रूग्णांना १ रुपयात जेवण देऊ इच्छितात. त्यानंतर वेंकट आणि त्यांची पत्नी रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन १० रुग्णांना १ रुपयांत जेवण देत होते. गेल्या काही महिन्यांपासून ही संख्या १० वरून ७० पर्यंत वाढली आहे. आगामी काळात ही संख्या १०० पर्यंत वाढविण्याचा मानस आहे. 

या त्यांच्या कार्यात त्यांना तोटा होत आहे, पण ते हे कार्य कायम ठेऊ इच्छितात. पण ज्यांनी १ रुपयात जेवण विकत घेतलं त्यांनी ते वाया घालून नये अशीही इच्छा वेंकट यांनी व्यक्त केली आहे. 

या दाम्पत्याला दोन मुली आहेत. एकीचं लग्न झालं आहे तर एक इंजिनिअरिंग करते आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.