खुशखबर, स्टेट बँकेत नोकरीची संधी

बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे, देशातील प्रतिष्ठीत बँक एसबीआयमध्ये खालील पदांसाठी भरती केली जाणार आहे.

Updated: Apr 7, 2014, 01:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे, देशातील प्रतिष्ठीत बँक एसबीआयमध्ये खालील पदांसाठी भरती केली जाणार आहे.
भारतीय स्टेट बँकमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 1 हजार 837 जागा खाली आहे, यातील 758 पद जनरलसाठी आहेत.
एसबीआयमधील नोकरी बँकेच्या क्षेत्रात अधिक महत्वाची मानली जाते. ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांना भारतात कोणत्याही जागी नोकरीसाठी पाठवण्यात येईल.
पात्रता
या जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं कमीत कमी वय 21 वर्ष आणि जास्तच जास्त 30 वर्ष असावं, एससी-एसटी उमेदवारांना वयाच्या बाबतीत 5 वर्ष तर ओबीसी उमेदवारांनी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
उमेदवाराचं वय 1 एप्रिल 2014 पासून मोजण्यात येईल, उमेदवार कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असला पाहिजे. निवडलेल्या उमेदवारांसाठी 14 हजार 500 ते 25 हजार 700 पर्यंतचा पगार निश्चित करण्यात आला आहे.
या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहेत. 24 एप्रिल रोजी रजिस्ट्रेशन बंद होणार आहे. एप्लिकेशन फीच्या स्वरूपात ओबीसी उमेदवारांकडून 500 रूपये आणि एससी-एसटी उमेदवारांकडून 100 रूपये घेण्यात येणार आहेत. ही फी जमा करण्याची शेवटची मुदत 25 एप्रिल आहे. ही फी दोन पद्धतीने जमा करता येणार आहे.
ऑफ लाईन मोड आणि ऑनलाईन मोड, ऑनलाईन मोडने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगने फी जमा करून फी देता येणार आहे, तर ऑफ लाईन मोड नुसार आपल्याला एसबीआयमध्ये जाऊन चलन भरून फॉर्म भरता येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.