उत्तराखंड : ...तर वाचले असते हजारोंचे प्राण!

उत्तराखंडातल्या महाप्रलायसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. हवामान खात्यानं याबाबतचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनानं हा इशारा गांभीर्यानं न घेतल्यानं हजारो जणांना आपले प्राण गमावावे लागले.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 30, 2013, 04:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
उत्तराखंडातल्या महाप्रलायसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. हवामान खात्यानं याबाबतचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनानं हा इशारा गांभीर्यानं न घेतल्यानं हजारो जणांना आपले प्राण गमावावे लागले.
१४ जून, १५ जून आणि १६ जूनला उत्तराखंडात जोरदार पाऊस होणार असून चारधाम यात्रा या काळात स्थगित करावी, अशी सूचना हवामान खात्यानं दिली होती. राज्याचे मुख्य सचिव, रुद्रप्रयागाचे जिल्हाधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांना हवामान खात्यानं हा अलर्ट पाठवला होता. केदरानाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथमध्ये १५ जूनला मुसळधार पाऊस आणि भूस्खलन होऊ शकतं. तसंच या परिसरात ३६ तास मोठा पाऊस होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं सतर्क राहावं, असा इशारा हवामान खात्यानं दिला होता. मात्र, मात्र याबाबत प्रशासन गाफील राहिलं आणि त्याचा काय परिणाम झाला हे आपल्या सर्वांसमोर आहे.

दरम्यान, या महाप्रलयात गायब झालेले तीन हजार जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी दिलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.