www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केदारनाथमध्ये प्रलयानंतर आता रोगराईच संकट उभ ठाकलय, त्यामुळे केदारनाथमध्ये जवळपास २५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. प्रत्येकाचे डीएनए राखून ठेवण्यात आलेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातले २३४ यात्रेकरू अद्याप बेपत्ता असल्याचं स्पष्ट झालंय.
प्रलयात मरण पावलेल्या माणसांचे आणि अनेक प्राण्यांचे मृतदेह आता घटनेच्या आठ दिवसानंतरही तिथेच पडून किंवा गालात दबुन असल्यानं परिसरात मोठी दुर्गधीं पसरलीय. यामुळे केदारनाथच्या परिसरात रोगराईचं संकट उभं राहीलंय. केदारनाथजवळ रामपूरमध्ये १५० जणांना डायरियाची लागण झाल्याचं कळतंय.
महाराष्ट्र राज्यातले २३४ यात्रेकरू अद्याप बेपत्ता असल्याचं स्पष्ट झालंय. पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. राज्यातल्या विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका-यांनी दिलेल्या माहितीवरून २३४ जणांशी अद्याप संपर्क झाला नसल्याचं स्पष्ट झालंय. मदत आणि पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी ही माहिती दिलीये.
या तांडवामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या DNAचे नमुने घेण्याचं काम आजपासून सुरू होण्याची शक्यता आहे. डॉक्टर दयाल सरन यांच्या नेतृत्वाखालील ६ जणांची फॉरेन्सिक टीम यासाठी तयार आहे. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरची उड्डाणं होत नसल्यामुळे या टीमला दुर्गम भागात जाणं अद्याप शक्य झालेलं नाही. DNA नमुने घेण्याची प्रक्रिया अंदाजे दोन दिवस चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिथंच या पार्थिवांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दरम्यान, उत्तराखंडमध्ये हवामान खराब झाल्यामुळे सकाळपासून हवाई बचावकार्य ठप्प झालंय. केदारनाथ, बद्रिनाथ इथं ढग दाटून आलेत, त्यामुळे एकही हेलिकॉप्टर उड्डाण भरू शकलेलं नाही. हवामान खराब असल्यामुळे बचावकार्य आणखी ३ ते ४ दिवसही चालण्याची शक्यता निर्माण झालीये.
उत्तराखंडात बद्रीनाथमध्ये अजूनही हजारो पर्यटक अडकून पडले आहेत. केदारमधील बचावकार्य संपलं असलं तरी बद्रीनाथमध्ये अजूनही हजारो पर्यटक अडकून पडले आहेत. यात महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. हवामानाच्या अडथळ्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होतायेत. ९ दिवस उलटून गेले तरी या पर्यटकांची सुटका होऊ शकलेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.