www. 24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उत्तराखंडात दाखल झालेत. उत्तराखंडातल्या महाप्रलयातून आतापर्यंत 30 हजार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र अद्यापही 32 हजार जण बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रातील शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.
या दुर्घटनेतील काही मृतांची ओळख पटविणं अवघड असून अनोखळी मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्प्ट केलंय. महाप्रलयात अडकलेल्या भाविकांसाठी मदत आणि बचावकार्य लष्काराकडून सुरु आहे.. अडकलेल्या भाविकांना जोशी मठ इथं हेलिकॉप्टरनं सुखरुप आणलं जातंय.
महाप्रलयात महाराष्ट्रातले अनेक भाविक अडकलेत... यांत गोंदियाच्या गुप्ता कुटुंबीयांचाही समावेश आहे...
उत्तराखंडमध्ये अडकलेला ५० जणांचा ग्रृप निजामुद्दीन एक्सप्रेसनं पुण्यात परतलाय. हे नागरिक केदारनाथमध्ये अडकले होते. त्यांच्या स्वागतासाठी नातेवाईकांनी गर्दी केली होती.
बद्रीनाथ,केदारनाथला गेलेल्या मराठवाड्यातील 501 यात्रेकरूंपैकी 372 जण सुखरुप असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र, 129 जणांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. महाराष्ट्रातून गेलेल्या यात्रेकरुंच्या नावांची यादी तयार करण्याचे निर्देश शासनाने 18 जून रोजी सर्व जिल्हाधिका-यांना दिले होते. त्यानुसार शासकीय आकडेवारीनुसार मराठवाड्यातून यात्रेसाठी गेलेल्या 501 जणांची नावं समोर आलीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.