नवी दिल्ली : योगी आदित्यनाथ यांचे मंत्री म्हणतात की आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्या मुस्लिमांनी हज सब्सिडी सोडावी कारण त्याच्या फायदा गरीब मुस्लीम व्यक्तीला होऊ शकेल.
यूपीचे मुस्लीम वक्फ आणि हज मंत्री मोहसिन रजा यांचं म्हणणं आहे की, हज यात्रेसाठी सबसिडी गरीबांसाठी आहे श्रीमंत मुस्लीमांसाठी नाही. त्यांची प्राथमिकता ही आहे की हजची सबसिडी योग्य व्यक्तीला मिळावी.
मोहसिन रजा म्हणतात की, 'आम्ही फक्त योग्य व्यक्तींना सबसिडी देऊ. जे हज यात्रेचा खर्च उचलण्यात असमर्थ आहेत. जर कोणी व्यक्ती लाखो-कोटींचा मालक आहे तर त्याला सरकारच्या पैशातून हज यात्रा नाही केली पाहिजे. आम्ही नियमांचं परिक्षण करुन लवकरच नवा निर्णय जाहीर करु. त्यांना हज सबसिडीमध्ये पारदर्शकता हवी. श्रीमंत मुस्लिमांना हज सबसिडी सोडण्यासाठी आणइ खाजगी एयरलाइंसने हज यात्रा करण्यासाठी आवाहन करु कारण त्यामुळे गरीब लोकांना हज यात्रा करण्यात मदत होईल.
मागच्या वेळी हज सबसिडीच्या वितरणात कोणातीही पारदर्शकता नव्हती. कोणाला हज सबसिडीसाठी निवडायचं यामध्ये पारदर्शकता नव्हती. जेव्हा मी गुरुवारी हज कमिटीच्या कार्यालयात गेलो तेव्हा पाहिलं की, हज यात्रींबद्दल हे माहित नव्हत की यूपीसाठी हज यात्रींचा कोटा वाढवला आहे. अधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल यात्रींना सूचित नव्हतं केलं. आमच्या सरकारमध्ये आम्ही या प्रक्रियेत पारदर्शकता आणू. असं नाही झालं पाहिजे की, मी मंत्री आहे म्हणून माझ्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना या सबसिडीचा लाभ व्हावा आणि मी त्यांना हज यात्रेसाठी पाठवू.