नवी दिल्ली : शिवसेना-भाजपमधला तणाव कमी करण्याचे प्रयत्न आता थेट दिल्लीतून होताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं आहे.
दिल्लीमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून उद्धव ठाकरेंना दिल्लीला बोलवण्यात आलं आहे. दिल्लीतल्या निवडणुकीनंतर अमित शहांकडून उद्धव ठाकरेंशी संपर्क वाढलेला आहे.
शिवसेना-भाजपमधला वाढता तणाव पाहता ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. आता उद्धव ठाकरे स्नेहभोजनाचं हे आमंत्रण स्वीकारणार का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.