लखनऊ : यूपीचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रस्त्यावर चालतांना दिसत आहेत. एकीकडे ते सबका साथ सबका विकासची गोष्ट बोलत आहेत तर दुसरीकडे ते गोरखपूरमध्ये मिनी सीएमओ बनवण्याची तयारी करत आहेत. पण अजून अधिकृतरित्या याची घोषणा झालेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार गोरक्षनाथ मंदिरचे अधिकाऱ्यांची सोमवारी सकाळी एक बैठक झाली, या बैठकीत गोरक्षनाथ मंदिरला मिनी मुख्यमंत्री कार्यालय म्हणून विकसीत करण्याची चर्चा झाली. गोरक्षनाथ मंदिर हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं निवासस्थान आहे.
सजवलं गेलं गोरक्षनाथ मंदिर
गोरखपूरमधील गोरक्षनाथ मंदिरामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री बनल्यानंतर योगी लखनऊमध्ये आहेत. लवकरच ते गोरखपूर जातील अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांचं स्वागत होणार आहे. गोरक्षनाथ मंदिराला फुलांनी सजवण्यात आलं आहे.
मंदिराची सुरक्षा वाढवली
गोरक्षनाथ मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मंदिराच्या दारावर आता आधुनिक हत्यारांसोबत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही भाविकाला आता चौकशीशिवाय आत नाही दिलं जाऊ देत आहेत. पोलीस आणि अधिकारी सुरक्षेवर नजर ठेवून आहेत.