अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा येत्या 9 डिसेंबरला मुंबईत लिलाव होणार आहे. त्यामध्ये पाकमोडिया स्ट्रीटवरील एका हॉटेलचाही समावेश आहे. त्यामुळे दाऊदची ही मालमत्ता कोण विकत घेतं, याकडं सगळ्याचं लक्ष लागलंय.

Updated: Dec 2, 2015, 06:49 PM IST
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव title=

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा येत्या 9 डिसेंबरला मुंबईत लिलाव होणार आहे. त्यामध्ये पाकमोडिया स्ट्रीटवरील एका हॉटेलचाही समावेश आहे. त्यामुळे दाऊदची ही मालमत्ता कोण विकत घेतं, याकडं सगळ्याचं लक्ष लागलंय.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यास केंद्र सरकारनं सुरूवात केलीय. दाऊदची दहशत संपवण्यासाठी सरकारने थेट दाऊदच्या मालमत्तेलाच हात घातलाय. त्याचाच एक भाग म्हणून ९ डिसेंबरला आयकर विभागानं दाऊदच्या मुंबईतल्या घराजवळील हॉटेल रौनक अफरोज लिलावात काढलंय.

पू्र्वीचे रौनक अफरोज आणि सध्याचे दिल्ली झायका हे दाऊदचे हॉटेल दाऊदची बहिण हसीना पारकर हिच्या मृत्यूनंतर गेल्या वर्षभरापासून बंदच असल्याचं सांगितलं जातंय. 

हॉटेलच्या लिलावाची जबाबदारी अश्विन एण्ड कंपनीला देण्यात आलीये. जे या लिलावात बोली लावणार आहेत, त्यांना ३ डिसेंबरला हे हॉटेल दाखवण्यात येणाराय. ८ डिसेंबर ही बोली नोंदवण्याची शेवटची तारीख आहे. तर ९ डिसेंबरला कुलाब्याच्या हॉटेल डिप्लोमॅटमध्ये या हॉटेलचा लिलाव होणार आहे.

गेल्या १६ वर्षात ४ वेळा दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव केला गेला.  दिल्लीतील अजय श्रीवास्तव आणि पियुष जैन या दोघांनी दाऊदची मालमत्ता विकत घेतली. पण अजूनही त्यांना या मालमत्तेचा ताबाच मिळाला नाही. 

डी गँगवर वचक असलेली दाऊदची बहिण हसिना पारकर हिचा आता मृत्यू झालाय. अंडरवर्ल्डची पहिल्यासारखी दहशत उरलेली नाही. त्यामुळं दक्षिण मुंबईतली ही मालमत्ता विकत घेण्यासाठी अनेकजण पुढं येतील, अशी आशा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.