भोपाळ : जगातील क्रमांक एकची महिला डबल्स टेनिस स्टार सानिया मिर्झाने अशी मागणी केली त्यामुळे मध्यप्रदेशच्या क्रीडा विभागाने तिला पुरस्कार सोहळ्यालाच न बोलविण्याचा निर्णय घेतला.
सानिया मिर्झाने आपल्या स्टाफसह पाच सदस्यांसाठी चार्टर्ड विमान मागितले. तसेच आपल्या स्टाफमधील पाच सदस्यांचे फी आणि मेकअपसाठी ७५ हजार रूपये तसेच स्वतःसाठी ५ लाख रुपये मागितले आहे.
सानिया या मागणीचा खुलासा क्रीडा मंत्री यशोधरा राजे सिंधिया यांनी सांगितले. राज्याच्या स्पोर्ट्स आणि युथ वेलफेअर खात्याने २८ नोव्हेंबर रोजी विक्रम पुरस्कार आयोजित केला होता. त्यासाठी सानियाला प्रमुख पाहुणी म्हणून बोलावले होते.
पण सानियाने चार्टर्ड विमान आणि नंतर इतर मागण्यांची लिस्ट पाठविल्यावर स्पोर्ट्स विभागाला धक्का बसला. हा प्रोग्राम पुढे ढकलला आणि सानियाच्या ऐवजी पी गोपीचंद यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.