गायीचं कातडं काढल्यामुळे काही जणांना मारहाण

गुजरातमध्ये उना इथं गायीचं कातडं काढल्यामुळे काही जणांना झालेल्या मारहाण प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दलित संघटनांनी राज्यभरात आज बंद पुकारला होता. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी अनेक ठिकाणी चक्काजाम केल्यामुळे महामार्गांवर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. काही ठिकाणी बसेसची तोडफोड, दगडफेक अशा घटनाही घडल्यात.

Updated: Jul 20, 2016, 10:35 PM IST
गायीचं कातडं काढल्यामुळे काही जणांना मारहाण title=

गांधीनगर : गुजरातमध्ये उना इथं गायीचं कातडं काढल्यामुळे काही जणांना झालेल्या मारहाण प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दलित संघटनांनी राज्यभरात आज बंद पुकारला होता. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी अनेक ठिकाणी चक्काजाम केल्यामुळे महामार्गांवर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. काही ठिकाणी बसेसची तोडफोड, दगडफेक अशा घटनाही घडल्यात.

मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आज पीडितांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, तसंच पीडितांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. या घटनेचं कोणीही राजकारण करू नये, असं आवाहन पटेल यांनी केलंय... दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही पत्रक काढून उनामधल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.