मुंबई : एनडीएच्या उद्या होणाऱ्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून NDA बैठकीचे निमंत्रण दिले होते. गुरुवारी शाह यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. अमित शहांचं आमंत्रण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं आहे.
विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच राष्ट्रपतीपदाचा NDA चा उमेदवार ठरवण्याबाबतही चर्चा अपेक्षित आहे. मोदींच्या शपथविधीनंतर म्हणजेच जवळपास मे २०१४ नंतर तीन वर्षांनी उद्धव ठाकरे आणि मोदी-शहा दिल्लीमध्ये भेटतील.
याआधी दोनवेळा उद्धव ठाकरे दिल्लीत येऊन गेले होते. यावेळी त्यांनी राजनाथ सिंह आणि अरुण जेटली यांची भेट घेतली होती. अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. दिल्लीतल्या प्रवासी भारतीय भवन येथे संध्याकाळी साडेसहा वाजता ही बैठक होणार आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातले भाजपचे दोन ज्येष्ठ मंत्री 'मातोश्री'वर सदिच्छा भेटीसाठी जाणार होते. मात्र NDA बैठकीच्या निमित्तानं जर पक्षश्रेष्ठी स्तरावरच शिवसेनेशी संबंध मधुर करण्यासठी प्रयत्न होण्याचे संकेत मिळाल्याने मंत्र्यानी त्यावेळी 'मातोश्री' पुढे ढकलली.