नवी दिल्ली : लाखो यात्रेकरूनां हव्या त्या ठिकाणी पोहचविणाऱ्या भारतीय रेल्वे प्रशासनाच्या स्टाफमध्ये प्रचंड मनुष्यबळाची कमतरता आहे. रेल्वेत सव्वा दोन लाख रिक्त पदे असल्याचे एका मोठ्या इंग्रजी वर्तमानपत्राने खुलासा केला आहे.
या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार रेल्वे बोर्डच्या एक सदस्य ऐवजी महाप्रबंधकचे चार पद तर डिवीजनल मॅनेजरचे असंख्य पदे रिक्त पडली आहेत. वरिष्ठ पदावर नियुक्ती झाली नसल्यामुळे महत्त्वपूर्ण निर्णय घेता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे
रेल्वेच्या विभिन्न ठिकाणी 1 एप्रिल 2014 मध्ये एकूण 2,25,863 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदामुळे रेल्वे प्रशासनाच्या कामावर कोणताही परिणाम होत, नसल्याचे रेल्वे राज्य मंत्री मनोज सिंग यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. पण रेल्वे स्टाफच्या मते त्यांच्यावर प्रचंड तणाव खाली काम करावे लागत आहे.
ड्राइवर, स्टेशन मास्टर, गार्ड, सिग्नल इन्सपेक्टर आणि स्टाफ ही रेल्वेमधील येथे सर्वात जास्त रिक्तपदे आहेत. विभिन्न विभागात परस्पर संघर्षामुळे असंख्या पदे रिक्त पडली आहेत. रेल्वे बोर्डच्या अध्यक्षसाठी अनेक दावेदार अधिकारी असल्यामुळे त्याच्यातून एक अधिकाऱ्याची निवड करण्यास विलंब होत आसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रेल्वे परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लीक करण्यात आल्यामुळे देखील नियुक्तीला उशीर होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.