मायावतींच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी, 2 महिलांचा मृत्यू

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्या रॅलीनंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दोन महिलांचा मृत्यू झालाय. तर 13 लोक जखमी झालेत.तसेच 100 हून अधिक जण बेपत्ता झाले असून त्यात अधिक लहान मुलांचा समावेश आहे.

Updated: Oct 9, 2016, 03:39 PM IST
मायावतींच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी, 2 महिलांचा मृत्यू title=

लखनऊ : बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्या रॅलीनंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दोन महिलांचा मृत्यू झालाय. तर 13 लोक जखमी झालेत.तसेच 100 हून अधिक जण बेपत्ता झाले असून त्यात अधिक लहान मुलांचा समावेश आहे.

बसपा संस्थापक कांशीराम यांच्या पुण्यतिथीनिमित्त ही रॅली आयोजित करण्यात आली होती. काशीराम स्मारक स्थळ येथील एक नंबर गेट येथे एंट्री घेत असताना ही चेंगराचेंगरी झाली. 

यात दोन महिला ठार झाल्या तर 13हून अधिक जण जखमी झालेत. जखमींना लोकबंधू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.