www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
चेन्नईत मध्य रेल्वेच्या स्थानकावर दोन स्फोट झाले आहेत. यामध्ये किमात सात जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दक्षिण रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के. मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटात एक महिला ठार झाली. तपासासाठी श्वान पथक बोलविण्यात आले.
गुवाहाटी एक्सप्रेसमध्ये दोन स्फोट झालेत. या स्फोटात अनेक जण जखमी झालेत. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. फलाट क्रमांक क्रमांक 9 वर मोठा आवाज आला. या स्फोटात 7 ते 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुवाहाटी एक्सप्रेसमधील एस 4 आणि एस 5 या दोन बोगीत स्फोट झाला.
जखमी लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 9 वर आली असता हा स्फोट झाला. या स्फोटाचे कारण समजू शकलेले नाही. गृह मंत्रालयाच्यावतीने स्फोटाचा दुजोरा देण्यात आलाय. मदत व बचाव ऑपरेशन सुरू आहे.. पोलीस आणि बॉम्ब विल्हेवाट पथक घटनास्थळी दाखल झालेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.