रेल्वे रुळावर ट्रेन थांबवून ड्रायव्हर अंघोळ आणि जेवणासाठी बाहेर

ट्रेन ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना दोन तास वाट बघायला लागल्याची घटना बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये घडली आहे. रेल्वे रुळावर अर्ध्या रस्त्यात ट्रेन सोडून ट्रेन ड्रायव्हर अंघोळ आणि जेवणासाठी बाहेर गेला होता, तो चक्क दोन तासाने परतला.

Intern - | Updated: Apr 14, 2017, 06:30 PM IST
रेल्वे रुळावर ट्रेन थांबवून ड्रायव्हर अंघोळ आणि जेवणासाठी बाहेर title=

नवी दिल्ली : ट्रेन ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना दोन तास वाट बघायला लागल्याची घटना बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये घडली आहे. रेल्वे रुळावर अर्ध्या रस्त्यात ट्रेन सोडून ट्रेन ड्रायव्हर अंघोळ आणि जेवणासाठी बाहेर गेला होता, तो चक्क दोन तासाने परतला.

ही पॅसेंजर ट्रेन पटनाहून मुगलसरायकडे निघाली होती. पटनाहून ती वेळेत निघाली होती. बक्सर स्टेशनला पोहचल्यानंतर 20 मिनिटे सिग्नल मिळेपर्यत ट्रेन थांबली होती. परंतु सिग्नल मिळाल्यानंतरही ट्रेन तिथेच उभी होती. प्रवाशांनी त्यावेळी चौकशी केली असता ट्रेन ड्रायव्हर तिथे नसल्याचे समोर आले. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच गोंधळ उडाला होता.

एवढेच नाही तर पॅनल कंट्रोलनेही खूपदा अनाऊन्स करूनही ट्रेन पुढे जात नव्हती. त्यानंतर ड्रायव्हरची शोधाशोध केली असता तो अंघोळ आणि जेवणासाठी बाहेर गेल्याचे समजले. ड्रायव्हरच्या या वागणूकीमुळे प्रवाशांना दोन तास वाट बघावी लागलीच, परंतु मागे येणाऱ्या गाड्याही थांबवाव्या लागल्या होत्या.