बंगळुरू-एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, ८ ठार ५० हून अधिक जखमी

बंगळुरुतल्या एनेकलजवळ एर्नाकुलम एक्स्प्रेसला भीषण अपघात झालाय. एक्स्प्रेसचे सहा डब्बे रुळावरुन घसरलेत.

Updated: Feb 13, 2015, 11:15 AM IST
बंगळुरू-एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, ८ ठार ५० हून अधिक जखमी title=
सौ. एएनआय

चेन्नई : बंगळुरुतल्या एनेकलजवळ एर्नाकुलम एक्स्प्रेसला भीषण अपघात झालाय. एक्स्प्रेसचे सहा डब्बे रुळावरुन घसरलेत. 

या अपघातात ८ जण ठार झाल्याचं समजतंय तर ५० हून अधिक जण जखमी आहेत.

बंगळुरूहून एर्नाकुलमला जात असलेल्या एक्सप्रेस सकाळी ७.४० वाजता होसूननजीक रुळावरून घसरलीय. यामध्ये, अनेक प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळतेय. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगोंदापल्ली आणि चंद्रपुरमनजीक अनेकलजवळ हा अपघात झालाय.  

कर्नाटक आणि तामिळनाडूहून अॅम्ब्युलन्स घटनास्थळी तातडीनं दाखल झाल्यात. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. जखमींना बंगळुरू आणि होसून इथल्या हॉस्पीटलमध्ये हलवलं जातंय.

 
 

  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.