नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशभरातील जनतेला एटीएम तसेच बँकांच्या रांगांचा त्रास सहन करावा लागला. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे केवळ साधारण लोकच त्रस्त झाले नाही तर देवाचे घर म्हणवणाऱ्या मंदिरासाठीही मोठी समस्या निर्माण झाली.
तिरुपती बालाजी मंदिरात नोटाबंदीनंतरच्या दोन महिन्यात तब्बल ४ कोटी रुपयांच्या ५०० आणि १०००च्या जुन्या नोटा दान म्हणून जमा झाल्यात. ३० डिसेंबरनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात जुन्या नोटांचे दान मंदिराच्या दानपेटीत जमा झालेय.
दरम्यान, इतकी मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाल्याने मंदिर प्रशासनासाठी चिंतेची बाब निर्माण झालीये. दरम्यान, मंदिर प्रशासनाने सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला याबाबत पत्राद्वारे माहिती देण्यात आलीये.