www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
चीनचे पंतप्रधान ली केचियांग यांच्याविरोधात दिल्लीत तिबेटी नागरिकांनी तीव्र निदर्शनं केली. तर भारतीय भूभाग बळकावल्याविरोधात जम्मूतही नागरिकांनी निदर्शनं केली. यावेळी नागरिकांनी ली आणि मनमोहनसिंग यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केल.
ली केचियांग सध्या भारताच्या दौ-यावर आहेत. चीनच्या लाल लष्करशाहीमुळे लाखो तिबेटी नागरिकांना देश सोडून इतरत्र निर्वासित म्हणून आश्रय घ्यावा लागलाय. आंदोलकांनी तिबेटला स्वातंत्र्य द्या अशी मागणी केली. अनेक तिबेटी विद्यार्थी आणि नागरिक दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले होते. आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलयं.
भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचं चीनचे पंतप्रधान ली केचियांग यांनी म्हटलंय. केचियांग यांच्या 3 दिवसीय भारत दौ-याचा आज दुसरा दिवस आहे. दुस-या दिवशी राष्ट्रपती भवनात चीनच्या पंतप्रधानांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन चर्चा केली.
त्याआधी चीनच्या पंतप्रधानांनी राजघाट इथं जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. दरम्यान पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्यासह चीनच्या पंतप्रधानांची हैदराबाद हाऊस इथं बैठक सुरु झालीय. भारत आणि चीन जगातील महत्वपूर्ण बाजारपेठा असून दोन्ही देशांमध्ये शांततापूर्ण वातावरण ठेवणं गरजेचं असल्याचं चीनच्या पंतप्रधानांनी म्हटलंय.
*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.