महिला आमदाराला पैशांसाठी धमकी

बिहारमधील बोचहा मतदार संघातून निवडून आलेल्या एका महिला आमदाराकडून १ कोटींची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा असा एसएमएसही त्यांना करण्यात आला आहे. 

Updated: Dec 19, 2015, 05:56 PM IST
महिला आमदाराला पैशांसाठी धमकी title=

मुजफ्फरपूर : बिहारमधील बोचहा मतदार संघातून निवडून आलेल्या एका महिला आमदाराकडून १ कोटींची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा असा एसएमएसही त्यांना करण्यात आला आहे. 

1 कोटी रुपये न दिल्यास परिवारातील लोकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  या विरोधात आमदार बेबी कुमारी यांनी मिठनपूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.  

आमदार बेबी कुमारी यांना लोक जनशक्ती पक्षाकडून तिकिट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. ज्यामध्ये त्यांनी जदयूच्या रमई राम यांचा मोठ्या मतांनी पराभव केला होता. निवडणुकीदरम्यानही त्यांना माघार घेण्यासाठी धमकी आली होती.