पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

गोवा राज्यात एक बेनाम पत्र मिळालं आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रावर आयसीस लिहलं आहे.

Updated: Jan 19, 2016, 04:31 PM IST
पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी title=

पणजी : गोवा राज्यात एक बेनाम पत्र मिळालं आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रावर आयसीस लिहलं आहे.

गोवा पोलिसांनी हे पत्र मिळाल्यानंतर सगळ्या पोलीस स्थानकांमध्ये त्याची माहिती पाठवली असून एटीएसकडे हे पत्र सोपवलं आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे की मागच्या आठवड्यात राज्य सचिवालयात हे पत्र आलं होतं. त्यानंतर गोवा पोलीस सतर्क झाली. हे पत्र कोणी पाठवलं आणि कुठून आलं याबाबतची चौकशी राज्यात सुरू आहे.

गोहत्या बंदी केल्यामुळे आयसीसने या पत्रामध्ये नाराजी वर्तवली आहे, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.