झारखंडमधील हजारो आदिवासी मुली पडतायत वेश्याव्यवसायाच्या बळी

रांची : झारखंड राज्यातील हजारो अल्पवयीन आदिवासी मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय

Updated: Feb 3, 2016, 09:22 AM IST
झारखंडमधील हजारो आदिवासी मुली पडतायत वेश्याव्यवसायाच्या बळी title=

रांची : झारखंड राज्यातील हजारो अल्पवयीन आदिवासी मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.

गरजू मुलींना शहरात रोजगार देण्याच्या आमिशाने शहरांमध्ये न्यायचे आणि त्यांना जबरदस्ती पॉर्न फिल्समध्ये काम करायला लावून त्यांचे शोषण करायचे यापद्धतीने हे सर्व प्रकार चालत असल्याचे समोर आलेय. 

हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, बनवलेल्या पॉर्न क्लिप्स व्हॉट्सअॅपवर पाठवून काही मुलींची बोली लावली जाते आणि त्यानंतर त्यांची विक्री केली जाते. त्यांच्यावर काही वेळेस सामूहिक बलात्कार केला गेल्याचेही एका पिडीत मुलीने सांगितलेय. 

इंटरनेटवर अनेक पॉर्न साईट्सवर झारखंड मेड, झारखंड व्हिलेज गर्ल, आदिवासी व्हिलेज गर्ल अशा टॅग्जनी पॉर्न क्लिप्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आदिवासी मुलींना या व्यवसायात ढकलण्याचे एक मोठे रॅकेट सुरू असल्याचा दाट संशय सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांना आहे. नोकरी देणाऱ्या काही एजन्सीजही यात सामील असल्याचाही संशय आहे.

२००५ पासून हरवलेल्या अनेक मुली आजपर्यंत सापडलेल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात सावळ्या रंगाच्या मुलींच्या पॉर्न क्लिप्सला मागणी असल्याने या मुली पॉर्न रॅकेटच्या बळी पडत असल्याची माहिती समोर आली आहे.