बिहार : बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. देशातील टॉप बॅचलेर ते बनले आहेत. तेजस्वी यादव यांना हजारो मुलींनी प्रपोज केलं आहे.
राज्यातील रस्त्यांची स्थिती कशी आहे याची माहिती देण्यासाठी तेजस्वी यादव यांना वॉट्सअॅप नंबर लोकांना दिला होता. पण यावर तक्रारींपेक्षा तरुणींचेच जास्त मॅसेजेस आल्याचं समोर आलं आहे. तरुणींनी त्यांची माहिती सुद्धा वॉट्सअॅपवर त्यांना पाठवली असून अनेकांनी लग्नासाठी मागणी देखील घातली आहे. ९० दिवसात असे हजारो मॅसेजेस त्यांना आल्याचं बोललं जातंय.