नवी दिल्ली : उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा पथकाने(एनआयए) तपास सुरु केला. या तपासाअंतर्गत एनआयए 11 दुकानदारांचीही चौकशी करतेय. यात एक मोबाईल फोन रिटेलरचाही समावेश आहे. रिटेलरने हल्ल्यापूर्वी काही दिवस आधीच 6 बिहार रेजिमेंटच्या सैनिकांनी सिमकार्ड दिले होते.
हल्ल्याच्या एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी निर्धारित वेळेपेक्षा तीन तास अधिक त्याचे दुकान सुरु होते त्यामुळे एनआयएच्या अधिकाऱ्यांची संशयाची सुई त्याच्याकडे वळलीये. त्याचे दुकान बंद झाल्यानंतर काही तासांतच तिथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
आर्मी कँपमध्ये साधारणपणे साडेसहा वाजता दुकाने बंद होतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, आर्मी पोलीस मेन गेटवरील रजिस्टरमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांची डिजीटल आणि प्रिंटच्या माध्यमातून माहिती ठेवली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दुकानदार अनेक वर्षांपासून बिग्रेडमध्ये आहे.
काही दिवसांपूर्वीच त्याने सैनिकांना सिमकार्ड दिले होते. हल्ल्याच्या एक दिवस आधी त्याने आपले दुकान 10 वाजता बंद केले होते. यावरुन संशयाची सुई त्याच्याकडे वळलीये. याप्रकरणी दुकानादाराची चौकशी केली जात आहे.