रेल्वे अर्थसंकल्पावर विरोधक म्हणतात...

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज त्यांचा दुसरा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. 

Updated: Feb 25, 2016, 03:11 PM IST
रेल्वे अर्थसंकल्पावर विरोधक म्हणतात...  title=

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज त्यांचा दुसरा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. या रेल्वे अर्थसंकल्पातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी या अर्थसंकल्पाचं अपेक्षेप्रमाणे कौतुक केलंय, तर विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. 

माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल : बायो-व्हॅक्युम टॉयलेट्सशिवाय या अर्थसंकल्पात काहीच नवीन नाही. या टॉयलेट्सचं पण यश किती असेल माहीत नाही. आणि ज्या लोकोमोटीव्ह कारखान्यांची घोषणा केलीये, ती तर माझ्याच काळात झालीये.

 

माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव : हे रेल्वे बजेट इतकं पोकळ होतं की भाजपच्या काळात रेल्वे पूर्णपणे रुळावरुन घसरल्याचं वाटतंय. भारताला बुलेट ट्रेनची गरज नाही. ती परदेशी लोकांची अपेक्षा आहे.

 

माजी परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर : आम्हाला तर शंका आहे की रेल्वेचा अर्थसंकल्प मांडला गेला की नाही. 

 

माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी : जेव्हा आम्ही या अर्थसंकल्पाची लेखी प्रत वाचू तेव्हा आम्हाला समजेल की 'अपयशाचा लेखाजोखा' काय असतो.

 

माजी राज्यमंत्री मिलिंद देवरा : घोषणा वगैरे ठीक आहेत, पण त्या कशा राबवल्या जाणार त्याची रुपरेखा सुरेश प्रभूंनी मांडायला हवी होती. मुंबईसाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे.