जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला जिवंत पकडलं

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलं आहे.

Updated: Feb 25, 2016, 03:06 PM IST
जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला जिवंत पकडलं title=

श्रीनगर: जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलं आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये या दहशतवाद्याला पकडण्यात आलं आहे. 

मोहम्मद सादिक गुज्जर असं या दहशतवाद्याचं नाव आहे, तो 17 वर्षांचा आहे. मोहम्मद हा कुपवारा जिल्ह्यातल्या तंगधार आर्मी कॅम्पवर हल्ला केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक आहे.

मोहम्मदला भारतीय लष्कर, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मदकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तो पाकिस्तानच्या सियालकोटचा असल्याचं तपासामध्ये समोर आलं आहे.

जैश-ए-मोहम्मदच्या अफजल गुरु स्क्वॉडचा मोहम्मद सदस्य आहे, आणि या हल्ल्याचं ट्रेनिंग अथमुकाम या पीओके भागात घेतल्याचं त्यानं सांगितलं आहे.