सात कोटींचा रेडा, ५० लाखांचे वार्षिक उत्पन्न

एका रेड्याची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते... लाख-दोन लाख... हैदराबादच्या एका प्रदर्शनामध्ये चक्क 7 कोटींचा एक रेडा आकर्षणाचा विषय ठरलाय... 

Updated: Jun 21, 2016, 03:59 PM IST

हैदराबाद : एका रेड्याची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते... लाख-दोन लाख... हैदराबादच्या एका प्रदर्शनामध्ये चक्क 7 कोटींचा एक रेडा आकर्षणाचा विषय ठरलाय... 

हरियाणामधल्या करमवीर सिंग यांचा युवराज हा रेडा बघण्यासाठी इथं गर्दी होतेय... करमवीर यांच्या म्हणण्यानुसार हरियाणात झालेल्या एका प्रदर्शनात त्यांना एकानं युवराजसाठी 7 कोटींची ऑफर दिली होती... मात्र त्यांनी ती धुडकावली... 

आपल्याला पैशांचं काही नाही... मुलाप्रमाणे वाढवलेल्या युवराजला कोणत्याही किंमतीला विकणार नाही, असं म्हणतायत... अर्थात, त्यांना हा रेडा मोठं उत्पन्नही मिळवून देतोय... करमवीर यांच्या सांगण्यानुसार त्यांना युवराजपासून वर्षाला 50 लाखांचं उत्पन्न मिळतं... 

अर्थात युवराजचा खुराकही तसाच आहे... दिवसाला 20 लीटर दूध, 5 किलो सफरचंद आणि 15 किलो अत्यंत उत्तम प्रतीचं पशुखाद्य त्याला लागतंच लागतं... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.