…हे उपाय केले असते तर वाचला असता ‘त्या’ तरुणाचा जीव!

दिल्लीच्या एका प्राणीसंग्रहालयात एका वाघासमोर त्याचं खाद्य चालून आल्यानंतर त्यानं काही क्षणांत त्याचा फडशा पाडला... या घटनेत एका तरुणानं आपला जीव गमावला. राजधानी दिल्लीला या घटनेनं हादरवून टाकलंय. 

Updated: Sep 24, 2014, 07:34 PM IST
…हे उपाय केले असते तर वाचला असता ‘त्या’ तरुणाचा जीव! title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या एका प्राणीसंग्रहालयात एका वाघासमोर त्याचं खाद्य चालून आल्यानंतर त्यानं काही क्षणांत त्याचा फडशा पाडला... या घटनेत एका तरुणानं आपला जीव गमावला. राजधानी दिल्लीला या घटनेनं हादरवून टाकलंय. 

वाघाच्या समोर पडल्यानंतर तब्बल 15 मिनिटं हा तरुण वाघासमोर हात जोडून विनवण्या करत होता... पण, या 15 मिनिटांत हा तमाशा पाहणाऱ्यांपैकी कुणीतरी वाघावर कुणीतरी दगड फेकून मारला.... आणि बारावीचा विद्यार्थी असणाऱ्या मकसूदचा जीव गेला. पण, जाणकारांच्या म्हणण्यानुसार, या 15 मिनिटांत मकसूदचा जीव वाचवणं शक्य होतं...

काय केलं जाऊ शकत होतं या 15 मिनिटांत...  
20 वर्षीय मकसूद वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यानंतर जवळपास 15 मिनिटांपर्यंत तिथल्या कर्मचाऱ्यांनी कोणतंही पाऊल उचललं नाही. यावेळी, या प्राणीसंग्रहालयात लटकणारी शिडी असती, तर मकसूदचा जीव वाचला असता.    
एकदा दोरखंड सोडूनही मकसूदचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता... मकसूद खाली पडल्यानंतर जवळपास 15 मिनिटं वाघ एकदम शांत होता.
वाघाला वेळीच ट्रॅक्युलाईजर गनच्या साहाय्यानं नशेची सुई टोचली असती तर त्याला बेशुद्ध करणं शक्य होतं. त्यामुळे, वाघाला आवरणं आणि मकसूदचा जीव वाचवणं शक्य होतं. या बंदुकीला कॅप्चर गन किंवा डर्ट गन असंही म्हटलं जातं. मांसभक्षी जनावरांना ताब्यात आणण्यासाठी प्राणीसंग्रहालयात यांचा उपयोग केला जातो.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.