रेल्वेच्या २५ हजार वॅट विद्युत तारेला तो लटकला...

झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात जादूगोडामध्ये शुक्रवारी एक तरुण रेल्वेच्या अति उच्च दाब विद्युत तारेला लटकला. मायंस रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. अति उच्च दाब विद्युत वायर जोडण्याचा प्रयत्न करताना ही घटना पुढे आली. 

Updated: Aug 7, 2015, 09:12 PM IST
रेल्वेच्या २५ हजार वॅट विद्युत तारेला तो लटकला... title=

रांची : झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात जादूगोडामध्ये शुक्रवारी एक तरुण रेल्वेच्या अति उच्च दाब विद्युत तारेला लटकला. मायंस रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. अति उच्च दाब विद्युत वायर जोडण्याचा प्रयत्न करताना ही घटना पुढे आली. 

रेल्वे विद्युत कर्मचारी ट्रेनच्या मदतीने ही उच्च दाबाची विद्यत तार जोडण्याचे काम करण्यासाठी चढला. मात्र, यावेळी रेल्वे सुरु होऊन पुढे गेली आणि हा कर्मचारी तारेला लटकला.

दरम्यान, उच्च दाब विद्युत तारेला कर्मचारी लटकला त्यावेळी विद्युत प्रवाह बंद होता. त्यामुळे त्याच्या जीवाचा धोका टळला. त्याचा जीव वाचला. मात्र, ट्रेन पुन्हा मागे न आल्याने त्याला तारेवर लटकावे लागले. तारेच्या मदतीने तो खाली उतरला. त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

रेल्वेच्या या तारेतून २५ हजार वॅटचा विद्युत प्रवाह वाहतो. मात्र, ज्यावेळी कर्मचारी फसला त्यावेळी विद्युत प्रवाह  बंद होता, त्यामुळे तो मृत्यूच्या दाढेतून वाचला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.