नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांची नमो अॅपवरुन मागवलेली मत आणि केलेला सर्व्हे मॅनेज केला असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे.
देशातली 90 टक्के जनता बँकासमोर रांगेत थांबली असल्यावर या सर्व्हेत किती शक्यता आहे असा सवाल मायावतींनी विचारला. काळ्या पैशांवर नोटाबंदी करुन सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला 93 टक्के भारतीयांनी साथ दिल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेबसाईटवरुन करण्यात आलाय.
The survey is fake and sponsored: BSP Chief Mayawati on 90% back #DeMonetisation move in PM Modi's app survey pic.twitter.com/mHdRvLKr88
— ANI (@ANI_news) November 24, 2016
यामध्ये दोन टक्के नागरिकांनी या निर्णयाला विरोध करणारं मत नोंदवलं आहे. नमो अॅपवर पाच लाख लोकांनी आपली मतं मांडल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेबसाईटवरुन म्हटल आहे.त्यापैकी 93 टक्के लोकांनी नोटाबंदीच्या बाजूने तर 2 टक्के लोकांनी विरोधात आपली मते मांडलीत. या सर्व्हे क्षणात प्रत्येक मिनिटाला चारशेपेक्षा अधिक उत्तरे प्राप्त झाली, असे मोदींच्या साईटवरील इन्फोग्राफिकमध्ये सांगण्यात आले आहे.
जगभरात विविध ठिकाणच्या दोन हजार नागरिकांनी सर्वेक्षणात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. त्यापैकी 93 टक्के भारतातील आहेत. सरकारचे हे पाऊल काळा पैसा रोखू शकेल असे 90 टक्क्यांहून अधिक उत्तरे देणा-या लोकांना वाटते. यासाठी फोर स्टारवरील रेटिंग देण्यात आलीय.