लखनऊ : मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बंडाचे निशाण फडकावले असून त्यांनी आपल्या २३५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता सपाने अधिकृतपणे दुसरी यादी जाहीर केली. शिवपाल यादवर यांनी ही यादी जाहीर केली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षात फूट पडलीय. इथल्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी यादव घराण्यातील संघर्ष टोकाला पोहचलाय. बुधवारी सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी 325 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर मुलायमसिंह यांचे बंधू शिवपाल यादव यांनी उर्वरित 78 उमेदवारांची यादीही जाहीर करुन पुतण्या आणि उत्तर प्रदेशचे मु्ख्यमंत्री अखिलेश यादव यांना आव्हान दिले आहे.
एकीकडे मुलायम आणि शिवपाल यादव या बंधूंनी सपाच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर केलीय. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही 235 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. हे सर्वजण सपाचे अधिकृत निवडणूक चिन्ह सायकलऐवजी दुसरे चिन्ह वापरणार असल्याचे समजतंय. त्यामुळे हे उमेदवार मुलायम आणि शिवपाल यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांना थेट आव्हान देणार आहेत. त्यामुळे यादव घराण्यातील कलह शिगेला पोहोचलाय.